अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
खामगाव शहर पोलिस स्टेशन समोरील महात्मा गांधी बगीच्याजवळ १३ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजे दरम्यान दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. *शेख कमरुद्दीन शेख कयामुद्दीन (३०), शेख सलमान शेख सलीम (२४), कलीमुद्दीन अजीसद्दीन मिर्जा (३०), शेख शकील शेख शकुर (३०) व शेख इरफान शेख कलाम* (४०) सर्व रा. *माटरगाव* हे एकमेकांना मारहाण करत होते. पोलिसांनी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


