पुणे विभाग प्रतिनिधी : सचिन दगडे
शिक्रापूर (ता. शिरुर):- परिसरात वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी व अपघात घडत असताना बेशिस्त वाहन चालकांमुळे असे प्रकार घडत असल्याने आता पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे.शिक्रापूर (ता. शिरुर येथील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याने पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार मिलिंद देवरे, अमोल नलगे, सहदेव ठुबे, पोलीस शिपाई ज्ञानदेव सोनवणे, ट्राफिक वार्डन किरण थोरात, राहुल वायकर, मुदस्सर मुलाणी यांनी शिक्रापूर येथील पुणे नगर महामार्गावर बेशिस्त वाहन चालकांसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई मोहीम सुरु केली असल्याने वाहन चालकांनी देखील चांगलाच धासका घेतला आहे,तर पोलिसांनी सुरु केल्या कारवाईचे नागरिक देखील कौतुक करत आहे तर याबाबत बोलताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत असून दररोज अशा स्वरूपाच्या कारवाया केल्या जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख यांनी सांगितले.


