पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख महाराष्ट्र
बातमी व प्रतिनिधी साठी संपर्क 9423170716
नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार आणि राहुल कुळमेथे यांच्या पाठपुराव्याला यश.
निधीअभावी मागील सहा महिन्यांपासून रखडले होते काम
एटापल्ली: मागील सहा महिन्यांपासून निधीअभावी रखडलेल्या एटापल्ली नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन कामाला अखेर यश आले आहे.राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा.ना.आशिष जैयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा खनिकर्म योजनेंतर्गत या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार आणि राहुल कुळमेथे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,निधीअभावी शहरात कचरा उचलणे आणि अत्यावश्यक नालेसफाईची कामे व्यवस्थित होत नव्हती. याची गंभीर दखल घेऊन त्यांनी 30 एप्रिल 2025 रोजी सहपालकमंत्री मा.ना.आशिष जैयस्वाल यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत सहपालकमंत्री महोदयांनी अवघ्या एका महिन्यात म्हणजेच दिनांक 30 मे 2025 रोजी निधी मंजूर केला आहे.यामुळे आता एटापल्ली शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरळीतपणे सुरू होणार आहे.
या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरपंचायत प्रशासनाने मा.ना. आशिष जैयस्वाल यांचे आभार मानले आहेत.

