हातकणंगले प्रतिनिधी – सचिन लोंढे
कुंभोज येथील समस्त धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला गावच्या विद्यमान सरपंच सौ. जयश्री महापुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यानंतर आयोजित रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरानंतर उपसरपंच अशोक आरगे, गटनेते किरण माळी, आप्पासाहेब पाटील, सदानंद महापुरे, दाविद घाटगे, अॅड. अमित साजनकर तसेच जवाहर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, यांच्या हस्ते उपस्थित रक्तदात्यांना प्रवासी बॅगचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, समस्त धनगर समाजातील कार्यकर्ते, महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले.

अहिल्यादेवींवरील माहितीपर पुस्तिका वाचून दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषणांद्वारे अहिल्यादेवींना आदरांजली वाहिली आणि त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण भानुसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल बंडगर यांनी केले.

