वर्धा प्रतिनीधी: – युसूफ पठाण
वर्धा जिल्ह्यातील देवळी गावामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील रेणुका जयंत दूरबुडे यांनी कोरोना काळामध्ये भारत सामाजिक विकास ग्रुप देवळी यांच्या फुटपाथ शाळा या उपक्रमात शिक्षिकेचे चोख आणि प्रामाणिक , निस्वार्थ कर्तव्य केले त्यामध्ये पालात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जमाती मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जवळपास बारा मुलांना शाळेत प्रवेश दिला. त्याचप्रमाणे वृक्षारोपण , रक्तदान , समाजसेवा तसेच पत्रकारिता या क्षेत्रात कर्तव्य करीत आहे त्यामुळे त्यांना दैनिक अहिल्याराज द्वारे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त गौरव तुमच्या कार्याचा कार्यकर्तृत्वाचा म्हणून राज्यस्तरीय महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2025 पुरस्कार सोहळा दिनांक ०१/०६/२०२५ रविवारला भातृ मंडळ सभागृह मलकापूर जिल्हा बुलडाणा येथे सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामुळे गावातील ज्येष्ठ पत्रकार , शिक्षक , प्राध्यापक , डॉक्टर , वकील तसेच मित्र परिवाराकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

