पुणे : शिक्रापूर गावचे युवा पत्रकार सचिन दगडे यांची काही महिन्यापूर्वी फसवणूक झाली होती,तर निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर अज्ञान व्यक्तींनी शिक्रापूर – हिवरे रोड वर हल्ला करायचा प्रयत्न केला होता त्यात ते सुदैवाने वाचले होते. तर त्यांच्या मोबाईल वरती अनोळखी वेगवेगळ्या नंबर वरुन धमकी चे कॉल आणि मेसेज त्यांना येत होते, त्यासंदर्भात त्यांनी तक्रार केली होती, तर त्या गोष्टी ला काही दिवस न होता ‘ सोशल मीडिया वरती त्यांचा फोटो असलेला त्यांचे फेसबुक अकाउंट अज्ञान व्यक्ती वापरीत असल्याचा प्रकार उगडीस आला आहे.
सदर त्या अकाउंट वरुन वेगवेगळे फोटो स्टोरी ला पडत असुन त्यावरून लोकांना मेसेज जात असल्याची तक्रार पत्रकार सचिन दगडे यांनी केली.
सदर सचिन दगडे हे पत्रकार असुन ते पुणे ग्रामीण पोलीस मित्राच कामकाज बगत असतात तर ते सामाजिक क्षेत्रात कामकाज करीत असतात तसेच त्यांनी अन्याय विरुद्ध अनेक वेळा आवाज उठवला असुन त्यांनी कोरोनाच्या काळात सुरक्षे साठी मास्क तसेच बाहेरुन आलेल्या कामगार लोकांना लॉक डाऊन मध्ये अन्न,आणि किराणा मालाचे किट वाटप केल आहे, समाजात होणाऱ्या अन्याय विरुद्ध आवाज उठुन सरकार मार्फत त्यांनी न्याय मिळुन देईचा प्रयत्न खुप वेळा केला आहे. तर पुण्यातील कोरेगाव भीमा येथे असणाऱ्या 1 जानेवारी च्या कार्यक्रमाला त्यांचा पोलीस शांतीदुत चा बंदोबस्त असतो त्यात जवळपास 300+ एवढे पोलीस मित्र असतात.
