पुसद तालुका प्रतिनिधी: – सिद्धार्थ कदम
पुसद : युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कचकलवार यांच्या आदेशानुसार काल दि 30 नोव्हेंबर २०२४ रोजी पुसद येथील शासकीय विश्रामगृहावर संघटनेच्या नावेन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यात सर्वश्री विनोद वसंतराव कांबळे यांची पुसद तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली यांच्यासह श्री प्रशांत सुभाषराव राठोड यांना पण पुसद तालुकाध्यक्ष पद देण्यात आले तसेच पुसद तालुका संघटक पदी सिद्धार्थ भिमराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली .तसेच सह संघटक म्हणून अनिल रामधन पवार यांना नियुक्ती देण्यात आली तसेच संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख महागांव पंचायत समिती चे माजी सभापती श्री नरेंद्र देवराव खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच वरिष्ठ पत्रकार श्री मारोतराव श्यामराव कांबळे यांची शहर उपाध्यक्ष पदी या अगोदरच नियुक्ती करण्यात आली होती ही नियुक्ती युवा ग्रामिण पत्रकार संघटना पुसद तालुका प्रमुख राजु डी राठोड यांच्या हस्ते करण्यात आली.


