पुणे विभाग:- सचिन दगडे शिरूर तालुका प्रतिनीधी
पुणे – तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदान येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. अहमद अन्वर शेख (वय ५२, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.अहमद शेख हे रस्ता ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसून अहमद हे गंभीर जखमी झाले. दरम्यान नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, याबाबत अमन अहमद शेख यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल नलगे हे करत आहे.


