वर्धा विभाग प्रतिनिधी: –
वर्धा:- आधुनिक भारताचा पाया रचण्यासाठी अनेकांचे योगदान राहिले आहे या सर्वात उच्च पातळीवर व प्रथमतः हा जर कोणाचा उल्लेख करायचा झाल्यास सत्यशोधक महात्मा ज्योतीराव फुले यांचा उल्लेख करावा लागेल कारण अर्थतज्ञ, व्यावसायिक उद्योजक, वास्तू रचनाकार, शिक्षण तज्ञ, इतिहास तज्ञ,कवी,लेखक,शेती विषयाचे अभ्यासक अशा कितीतरी क्षेत्रात म. फुलेंच कार्य भारतात प्रथमच आहे मात्र जाणून बुजून त्यांचे कार्यकर्तृत्व झाकोळल्या गेले मात्र हे सर्व कार्याचा आलेख लक्षात घेता म ज्योतीबा फुले हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी प्राचार्य जनार्दन देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
सत्यशोधक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १३४ व्या स्मृतीदीनाचे औचित्य साधून साईनगर चौकातील सहकार उद्यानात नगर परिषदे व्दारे आमदार डॉ पंकज भोयर यांच्या विकिसनिधीतून उभारण्यात आलेल्या म.ज्योतीराव व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या काढलेल्या म्युरल चित्रा जवळ अभिवादन सभेचे आयोजन आज सकाळी १० वाजता दिनांक २८ नोव्हेंबर या म.ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त करण्यात आले होते या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मेहरे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी प्राचार्य जनार्दन देवतळे यांनी म ज्योतीबा फुले यांच्या जिवणावर प्रकाश टाकताना अनेक लपलेले त्यांचे कार्य उदा पुणे येथील खडक वासला धरणाची निर्मिती, मुंबई महानगर पालिकेची व छत्रपती शिवाजी महाराज जनसंघ मुंबई याची देखणी व जगविख्यात वास्तू,सयाजी गायकवाड महाराज यांचा भला मोठा राजवाडा असे अनेक वास्तू त्याच्या मार्गदर्शनाखाली उभ्या राहल्या,तर त्यावेळी स्पेशल रेल्वेने भारताच्या अनेक भागात भाजीपाला पाठविण्याचा फुलांचा व्यवसाय करून अनेकांना रोजगार निर्मिती केली त्यावेळी प्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या पेक्षा एक हजार रुपये वार्षिक उत्पन्न म ज्योतीबा फुले यांचे अधिक होते म फुले मुबंइचे कमिश्नर होते त्या काळात अनेक लोक उपयोगी सुधारणा त्यांनी मुंबईत केल्या अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनय डहाके, प्रास्ताविक सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गुणवंत डकरे यांनी तर आभारप्रदर्शन कलार समाज संघटनेचे राजेंद्र कळसाईत यांनी केले कार्यक्रमास काॅग्रेसच्या कायदा विभागाच्या सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड नंदकुमार वानखेडे,सावता माळी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चर्जन, विद्रोही साहित्य संमेलनाचे समन्वयक संदिप थुटे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


