पुणे विभाग प्रतिनीधी: – सचिन दगडे
पुणे : चाकण – शिक्रापूर रस्त्यावर बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास शेलपिंपळगाव ते बहुळ ( ता. खेड ) दरम्यान कंटेनर, माल वाहतुकीचा लहान टेम्पो व मोटार कार अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मालवाहतुकीच्या टेम्पोतील दोघे जागीच ठार झाले. मोटारकार मधील सर्व जन बचावले असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
चेतन शाळीग्राम आहिरे (वय 24 वर्ष सध्या रा. कडाची वाडी , ता. खेड मूळ रा. बुलढाणा ) व गणेश मारुती पानसरे ( वय 42 रा. बहुळ ता. खेड ) अशी या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिक्रापूर बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची समोरून येणाऱ्या मालवाहतुकीच्या टेम्पोला आणि एका मोटार कारला जोरदार धडक बसली.कंटेनरच्या धडकेत दूरवर फेकल्या गेलेल्या मालवाहतुकीच्या टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला. टेम्पो मधील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. वाहनात अडलेले मृतदेह काढणे देखील अवघड झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. मोटार कार मधील सर्व जन दैवबलवत्तर मधून बचावले. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून फरारी झाला आहे. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांकडून पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली.


