भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
समाज क्रांतीचे जनक महात्मा जोतिरावं फुले
महाराष्ट्राच्या पावन भूमीवर
जन्मास आले जोतिबा फुले
शिकवून प्रथम सावित्रीला
महिलांसाठी शिक्षण केले खुले ||१||
निर्धार केला जोतिबांनी
बहुजनांच्या उद्धाराचा
स्पृश्यास्पृश्य भेद मोडून
केला हौद खुला पाण्याचा ||२||
सर्वसाक्षी जगतपती नकोची मध्यस्थी
नारा जोतिबांनी दिला
अन्याय अंधश्रद्धा दुर करण्या
सत्यशोधक समाज स्थापन केला ||३||
बालविवाहास करुनी विरोध
बालहत्या प्रतिबंधकगृह केले स्थापन
विधवा विवाहाचे केले समर्थन
महात्मा पदवी तयास अर्पण ||४||
उभारुनी क्रांतीचा लढा
बंद केली गुलामीची वळवळ
नमन माझे क्रांतीसुर्यास
ज्यांनी सुरु केली सत्यशोधक चळवळ ||५||
प्रा. प्रितम माकोडे
इंदुताई मेमोरियल कनिष्ठ महाविद्यालय हरदोली (झं.)
ता. मोहाडी जि. भंडारा

