लोहा प्रतिनीधी: – (शुभम उत्तरवार)
लाेहा येथील श्री संत गाडगे महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची दि. 12 मार्च रोजी शैक्षणिक सहल संपन्न झाली. सदरील सहलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘ट्वेण्टी-वन शुगर लिमिटेड युनिट नं -3 शिवणी (जा.)’ या साखर कारखान्यास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या औद्यागिक सहलीमुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना कच्चा मालापासून ते पक्के उत्पादन होई पर्यंतच्या सर्व प्रक्रियेची प्रत्यक्षात पाहणी करता आली. या शैक्षणिक सहलीमध्ये वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
या औद्योगिक सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोकरावजी गवते साहेब, प्रा.डॉ. एस.व्ही.मंडगे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तर या औद्योगिक सहलीमध्ये वाणिज्य विभागाचे प्रा.प्रसाद सूर्यवंशी, प्रा.आशीष गोरे, प्रा.तनुजा साबदे, प्रा. शिवकन्या जांगठे यांनी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ट्वेण्टी वन साखर कारखान्याचे कुलकर्णी सर, गजानन तेलंग सर यांनी कारखान्याची उत्पादन प्रक्रिया विद्यार्थ्याना समजावून सांगितली .
ही औद्योगिक सहल यशस्वी करण्यासाठी वाणिज्य अभ्यास मंडळ अध्यक्ष कु. मंजली जोंधळे , कु.संध्या भुजबळ, सोपान पौळ, कु.साक्षी शिंदे , ऋषिकेश जामगे, गोकुळ राठोड यांच्यासाेबतच वाणिज्य विभागातील सर्व सहभागी विद्यार्थ्यानी सहकार्य केले.
