वर्धा – भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब गांधी सिटीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन साजरा केला. संविधानाच्या महत्त्वाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने गांधी सिटी क्लबच्या सदस्यांनी आंबेडकर पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात लायन्स क्लब गांधी सिटीचे डायरेक्टर अनिल नरेडी, संदीप चिचाटे, अध्यक्ष आशिष पोहाणे आणि उपाध्यक्ष सुरेशकुमार बरे , सामाजिक कार्यकर्ते विनय डहाके, भारत चौधरी, नरेंद्र चर्जन, डॉ .अविनाश गवळी , पोलिस बॉईज असोसिएशन चे किशोर ढोणे, ललिता कुकडे योगिता मसराम यांची प्रमुख उपस्थिती होती.श्वेता नागतोडे यांनी रांगोळी व मेणबत्ती च्या माध्यमातून उत्कृष्ट सजावट केली .पुष्पमाल्या अर्पण करून उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाला वंदन केले.
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने भारताचे संविधान स्वीकारले, आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे भारतीय लोकशाहीला न्याय, समता, स्वातंत्र्य, आणि बंधुता या मूल्यांचा पाया मिळाला.
या निमित्याने कार्यक्रमादरम्यान 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपले योगदान देण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भारतीय संविधानाचे महत्त्व ओळखून “प्रथम भारतीय, अंतिमतःही भारतीय” हा संदेश देण्याची प्रतिज्ञा घेतली.



