बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
लोणार.येथील प्रमूख स्थानिक सीबीएसई शाळा लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल येथे दि. २२/०१/२०२५ आणि दि. २३/०१/२०२५ रोजी दोन दिवसीय सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचा उत्कृष्ट नमुनाच होता. विविधांगी व बहुआयामी कार्यक्रम, विविध राज्यांच्या संस्कृती, परंपरा व जीवनशैलीच्या छटा उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.

- यामध्ये फेस्टिवल ऑफ इंडिया थीम, त्रिब्युट टु सोल्जर्स थीम, शिवराज्याभिषेक सोहळा, पीपीटी प्रस्तुती व शेतकरी थीम प्रमूख होते तर पंजाबी थीम, ओरिसा थीम, रामस्तुती, जैन थीम, लब पे आती है दुआ, गुजराती, राजस्थानी, हरियाणवी, साऊथ इंडियन, सेमिक्लासिकल, अंबाबाई नृत्य, सत्संग, कृष्णा थीम, स्पोर्टस थीम, बंजारा थीम डान्स, पहाडी डान्स, शाहरुख, गोविंदा, अक्षय कुमार स्पेशल, देशभक्तीपर व जुन्या गाण्यांवरील नृत्य, सरस्वती वंदना, मेरे पापा, आहा टमाटर व मराठी हिंदी फ्यूजन डान्सेस यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
हा कार्यक्रम म्हणजे जणू विद्यार्थ्यांच्या सूप्तगुणांचा आविष्कार ठरला. वर्गशिक्षकांनी नृत्यशिक्षकाची मदत न घेता स्वतः सर्व इव्हेंट व थीम बसवले हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शेख मसूद शेख उस्मान तर प्रमूख पाहुणे संजय रायमुलकर आमदार लोणार मेहकर मतदारसंघ, अमित झनक आमदार रिसोड मतदारसंघ, भूषण पाटील तहसीलदार लोणार, निमिश मेहेत्रे ठाणेदार लोणार, योगेश्वरी परळीकर नायब तहसीलदार लोणार, खुशालराव मापारी अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था लोणार, प्रकाशराव मापारी सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था लोणार, शेख महेमूदसेट माजी सदस्य नगरपरिषद लोणार, बळीभाऊ मापारी जिल्हाप्रमुख शिवसेना बुलढाणा, गुलाब राठोड केंद्रप्रमुख लोणार, गजानन खरात प्राध्यापक भगवान बाबा महाविद्यालय लोणार, भिकमचंद रेदासनी माजी प्राचार्य महाराणा प्रताप हायस्कूल लोणार, खुशालराव गवई माजी प्राध्यापक भगवान बाबा महाविद्यालय लोणार, अफसर खान मार्गदर्शक एलसीपीएस, अन्य मान्यवर व पत्रकार उपस्थित होते. प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी व उपप्राचार्य नबील शेख यांनी कार्यक्रमाचा आराखडा बनविला व यशस्वी नियोजन केले. कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व साहित्यांची उपलब्धता मॅनेजिंग डायरेक्टर मो. फैसल यांनी केली. शिक्षक सुशील सोसे, ज्ञानोबा बडे व विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केले.


संघटितरित्या कार्य केल्यावर कार्यक्रम कसे यशस्वी होते हे सर्व शिक्षकांनी दाखवून दिले. पीआरओ अंकुश चव्हाण, गणेश राठोड, समन्वयक संदीप साळवे, समन्वयक प्रवीण परहाड, अन्य शिक्षक योगेश वनवे, निवृत्ती कायंदे, रामदास चव्हाण, निश्चल आंबेकर, रोहित निशाने, लियाकत अली, ज्ञानेश्वर पोळ आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेची धुरा सांभाळली. वैशाली खांदेभरड, सपना शेटे, तृप्ती व्यास व अन्य स्त्री शिक्षिकांनी व्यासपीठ सजावट व उत्कृष्ट स्वागत समारंभ नियोजन केले. शाळेतील चालकांनी कार्यक्रम सुरक्षित व मैत्रीपूर्ण बनवला.

