अकोला जिल्हा प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोटः ग्रामीण पो. स्टे. ठाणेदार जुनघरे यांच्या मार्गदर्शनात दाखल अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण अप क्र. ४९०/ २०२४ कलम १३७ (२), ६४, ६४ (२) (डी) भान्यास. सहकलम ४, ६ पोक्सो मधील आरोपी आकाश नारायण भलावी २५ याला अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने एका १६ वर्षीय अल्पवयीन पीडितेला तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली.


