पुणे : सचिन दगडे
पुणे : चाकण शिक्रापूर रोडवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका भरधाव कंटेनरने वाटेत आलेल्या जवळपास 20 हून अधिक वाहनांना उडवले आहे.
या दरम्यान समोर आलेल्या फुटेजमध्ये हा कंटेनर समोरील टेम्पो व त्याच्यासमोरील बाईकस्वाराला उडवताना दिसतो आहे.भरधाव कंटेनरने चाकणच्या माणिक चौकात चाकण मध्ये दोन महिलांना उडवले.यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने इतर वाहनांना ठोकल्याचे समजत आहे.
त्यांनतर पुढे मेदनकर वाडी फाटा येथे पाच वर्षाची मुलीला उडविले. पुढे शेल पिंपळगाव मध्ये सेलेरो आणि एका गाडीला उडविले. त्यानंतर पुढे बहुळ गावमध्ये पोलिसांची एर्टिगाने अडवण्याचा प्रयत्न केला असता तिलाही या गाडीने धडक देण्याचा प्रयत्न केला. पुढे चौफुला मध्ये टाटा एस ही गाडी पलटी होऊन तिच्या खाली बाईकस्वार महिला अडकल्याचे समजत आहे.

अकिब खान ( वय २५ , रा. हरियाणा ) असे कंटेनर चालकाचे नाव आहे. चाकण पोलिसांनी आणि परिसरातील तरुणांनी त्याला पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. ठिकठिकाणी स्थानिकांना कळवून वाहने आडवी लावण्यात आली. मात्र बेभान कंटेनर चालकाने आडवी लावलेली वाहने उडवत पुढे निघाला . बहुळ भागात पोलिसांनी बॅरिगेटिंग केले होते. त्यानंतर त्याने पुन्हा यु टर्न घेत मागे वळाला. यावेळी त्यांनी चाकण पोलिसांच्या वाहनाला धडक दिली.
चाकण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्याने संबंधित चालक नागरिकांच्या हातून बचावला. अन्यथा संतप्त जमावाने त्याला ठार केले असते असे काही प्रत्यक्ष दर्शनी कळवले आहे. दरम्यान या थरारक घटनेने या भागात खळबळ उडाली आहे. एकूणच या संपूर्ण अपघातांच्या घटनांमध्ये 20 ते 25 वाहनांचे ठिकठिकाणी नुकसान झाले असून सात ते आठ जण जखमी असल्याचे समजते. नागरिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या कंटेनर चालक रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.


