वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
आर्वि तालुका जिल्हा वर्धा येथे सरकिस्टहाऊस मध्ये बँन्ड मालक आणि बँन्ड कलाकारांची नोंदणी सभा संपन्न झाली .
काल दिनांक १५/०१/२०२५ ला मा.अजय भाऊ डोंगरे विदर्भ तथा जिल्हाध्यक्ष बहुजन रयत परिषद , मा. किशोर भाऊ वाघमारे उपजिल्हाध्यक्ष बहुजन रयत परिषद , मा. सुभाष भाऊ सरकटे आर्वि तालुका अध्यक्ष बहुजन रयत परिषद , मा. किशोर भाऊ मुंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत बँन्ड कलाकार आणि बँन्ड मालका ची सभा सरकिस्टहाऊस आर्वि येथे संपन्न झाली.

या सभेला बँन्ड कलाकार आणि बँन्ड मालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँन्ड कलाकारांना
१) आधार कार्ड
२) दोन फोटो पासपोर्ट
३) पासबुक ची झेरॉक्स
४) वयाचा पुरावा , लिव्हिंग/डॉक्टर चे प्रमाणपत्र
५) कलाकार असल्याचा २० वर्षाचा पुरावा . बँन्ड मालकाच प्रमाणपत्र
अश्या प्रकारच्या कागदपात्रांनी
कलाकार नोंदणी करीता करायची या बाबत अजय भाऊ नी सर्वांना, सोप्या भाषेत समजावून सांगितले.
१) राज्य स्तरीय बँन्ड स्पर्धा घेण्या बाबतीत सर्वांनी अनुमती दिली.
२) विदर्भ स्तरांवर मातंग समाज अधिवेशन घेण्यात यायला पाहिजे .
यातुन समजात काही अडचण असल्यास लगेच त्यावर उपाय शोधायला मार्ग मिळतो अश्या महत्त्वाच्या विषयावर अजय भाऊंनी मार्ग दर्शन केले.
समाज बांधवांनी सहकार्य करण्याचे आश्वासन हि दिले .
या सभेला बँन्ड कलाकार आणि बँन्ड मालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


