सिद्धार्थ कदम
पुसद तालूका प्रतिनिधी
पुसद : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ह्या जाधवांच्या कन्या भोसल्यांच्या सून होत्या,त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या सद्गुण,शौर्य आणि दूरदृष्टीसाठी त्या या अतुलनीय गुणांसाठी ओळखल्या जात होत्या.एक कुशल घोडेस्वार देखील त्या होत्या.अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत असत.राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण आणि भगवद्गीता या धर्मग्रंथांचे हत्त्व सांगितले. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल शिकवले व योग्य संस्कार दिले.माणुसकीच्या भिंत सदस्य व महिला सदस्यांनी व पुसद मधील शुभचिंतकांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्साहा निमित्य माणुसकीची भिंत पुसद उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन माणुसकीची भिंत महिला सदस्यांनी व मान्यवराच्या हस्ते करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना पुष्पहार अर्पण करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त माणुसकीची भिंत महिला सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या नवजात शिशुच्या मातांना राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाई अशा थोर महिलांची पुस्तके दिली व नवजात मुला मुलींना नवीन कपडे जेवण व फळे देऊन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळेस माणुसकीची भिंत महिला सदस्यांनी नवजात शिशूंच्या मातांना आव्हान केले की, मुलगा मुलगी भेद न करता मुलांना चांगले शिक्षण व चांगले संस्कार देऊन एक आदर्श व्यक्ती बनवावे जसे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले त्याचप्रमाणे आपण आपली मुले घडवावी असे सांगितले,यावेळेस उपस्थित मान्यवर संतोष पद्मावार,वंदना संतोष पद्मावार,सागर संतोष पद्मावार, सौ.प्रीती सागर पद्मावार,कुमारी संप्रेती सागर पद्मावार ,प्रमोद दिगांबर अनंतवार ,सौ.शितल प्रमोद अनंतवार, संतोष बाळाभाऊ मुत्तेपवार, सौ.पल्लवी संतोष मुत्तेपवार, संस्कार संतोष मुत्तेपवार, नंदकुमार खैरे ,विठ्ठलराव शेवाळे, शिवाजीराव कदम, प्रभाकरजी टेटर, गिरीधर ठेंगे पाटील, प्रवीण कदम ,जीवा जाधव, प्रकाश येल्हेकर ,तसेच माणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्य सौ.मोनिकाताई जाधव, सौ.रेखाताई आगलावे, सौ.पूजाताई इंगोले, सौ.अल्का आघाम,तसेच सदस्य पंजाबराव ढेकळे,अनंता भाऊ चतुर, शिवरामजी शेटे ,धनंजय आघाम, आदित्य जाधव ,दीपक घाडगे. व माणुसकीची भिंत शुभचिंतक उपस्थित होते.


