सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद /मंगरुळपीर:-नागपूर येथे २२ वे राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलन आणि भव्य पुरस्कार वितरण सोहळा दि.२२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सेवाभावी व्यक्तीमत्व तथा पञकार फुलचंद भगत यांना ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने’ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा.अँड.निल लाडे आणि संस्थापक सचिव दिनेशबाबु वाघमारे यांच्या पुढाकाराने कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात,घटनाकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सन्मान समाजसेवेचे व्रत घेतलेल्या तळागाळातील सामान्य बहुजन समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्याना मिळाला पाहीजे.बहुजनांचे सेवाव्रती कार्य जगाला माहिती होऊन,सामाजिक कार्यकर्त्याचे मनोबल उंचावण्याच्या उदात्त हेतूने हा पुरस्कार सोहळा आयोजीत केला होता.रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी श्री गुरुदेव सेवाश्रम,दिवंगत डॉ.प्रा. प्रकाशजी सोनक परिसर सभागृह नागपूर येथे हा सोहळा पार पडला.वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीरचे फुलचंद भगत यांच्या सामाजिक कार्याचा व सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना संस्थेचे राज्यस्तरिय पुरस्काराचे मानपत्र,सन्मानचिन्ह, तिरंग्याची शाल व भारतिय संविधानाची प्रत देवून गौरविण्यात येणार आहे.या शाही संस्मरणिय कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार मा. विकासभाऊ ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राधिकादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक मा.गीरीष पांडव, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी अ.जा. विभाग अध्यक्ष इंजि.रूपराज गौरी हे असणार आहेत.तर प्रमुख पाहूणे उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजय मेश्राम, नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.अभिजीत वंजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक नागपूरचे अध्यक्ष मा. अनिल नगरारे,विशेष पाहुणे मा.नगरसेवक मा.मनोज साबळे, मा.नगरसेवक मा.सुभाष भोयर, मा.नगरसेवक
मा.वासुदेव ढोके, मातोश्री भागिरथाबाई शिक्षण संस्था पारशिवनी,नागपूरचे अध्यक्ष मा. उमाकांत बागडकर,मा.नगरसेवक मा.मनोज गावंडे,मा. मा.डॉ.अशोक यावले,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा जि.वाशिम अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार मा.संजय कडोळे,सुप्रसिद्ध मराठी नाट्य कलावंत मा.अशोक गवळी यांचेसह महाराष्टभरातुन विविध मान्यवरांची ऊपस्थीती होती.पञकार तथा सामाजीक कार्यकर्ते यांना मिळालेला ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कारा’मुळे वाशिम जिल्ह्याची मान ऊंचावली आहे.
फुलचंद भगत यांच्या सेवाभावी कार्यामुळे तसेच सडेतोड लेखनीच्या पञकारीतेची दखल घेवुन याआधीही महाराष्ट आॅयकाॅन अवार्ड,राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्कार,अभिमान पुरस्कार,महाराष्ट गौरव,पञकार भुषण,प्रेष्टीजिअस अवार्ड,महाराष्ट रत्न अशा विविध पुरस्काराने गौरविन्यात आले आहे.अल्पावधितच फुलचंद भगत यांनी आपल्या पञकारीता आणी समाजसेवेची छाप वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यात पाडल्यामुळे त्यांचे विविध स्तरातुन कौतुक होत आहे.