अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात ४२ वर्षीय दिव्यांग महिलेवर अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडित महिला घरात झोपली असताना आरोपीने तिच्या घरात प्रवेश करून महिलेवर अत्याचार केला. यावेळी महिलेने प्रतिकार केला व आरडाओरडा केल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.


