अकोला विभाग प्रतिनिधी गणेश वाडेकर
बार्शिटाकळी तालुक्यातील चेलका गावातील शेतकऱ्यांच्य शेतातील हजारो रुपये किमतीच्या झटका मशीन चोरीला गेलेल्या आहेत. याबाबत सीताराम परंडे यांनी आज बार्शिटाकळी ठाणेदारांना तक्रार दिली आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील धाबा बीट कार्यक्षेत्रातील चेलका गावाच्या शिवारातील गट नंबर २२/१ या शेतात काही दिवसांपूर्वी हरभरा पिकाची पेरणी केली होती. सदर पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्याकरिता शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून शेताला तार कुंपण केल्यानंतर झटका मशीन लावण्यात आल्या होत्या.


