अकोला विभाग प्रतिनीधी: -गणेश वाडेकर
शेतातील गोडावूनमधून चोरट्यांनी ४ क्विंटल ५० किलो गहू लंपास केल्याची घटना आज खानापूर-पारडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विलास हरिदास टप्पे (५०, रा. खानापूर) यांचे खानापूर-पारडी रस्त्यावर शेत आहे. या शेतात सिमेंट व टिनाचे गोडावून बांधलेले आहे. या गोडावूनमधील *९ कट्टयांमध्ये एकूण ४ क्विंटल ५० किलो गहू प्रत्येकी किंमत ३ हजार ५०० रुपये क्विंटलप्रमाणे एकूण किंमत १५ हजार ७५० रुपये अज्ञात चोरट्याने* गोडावूनचे कुलूप तोडून लंपास केला.

