अकोला जिल्हा प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
–अकोला*: चान्नी, मळसूर येथे वरली मटका अड्ड्यावर धाड
पातूर तालुक्यातील चान्नी व मळसुर येथे गेल्या काही दिवसापासून वरली मटका अड्डा सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक संजय कोहळे, सुनील भाकरे, दिनेश झटाले, उमेश सांगळे आदींनी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली चान्नी मळसुर या दोन्ही वरली मटका अड्डा सुरू असल्याच्या ठिकाणाहून दोन आरोपींना ताब्यात घेतले, त्यांच्याकडून वरली मटका चालविण्यासाठी वापरण्यात आलेल्या वरली मटका चिठ्ठया व रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


