अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
मुख्याध्यापकाने शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील एका शाळेत हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपीवर कोणतीही कारवाई होत नसल्याने पीडिताने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या घटनेने जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पीडिता ही भाजप नेत्याची मुलगी आहे. अकोट शहरातील एका शाळेत शिक्षिका असलेल्या तरुणीकडे शाळेतील मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केली होती.


