अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला:- अकोल्यातील आगर गावात ऐन दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात चोरीची घटना समोर आलीय. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दानपेटीवर हातसाफ केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आज दत्त जयंतीच्या दिवशी दानपेटी उघडण्यापूर्वीच पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दत्त मंदिराचा कडी कोंडा तोंडून मंदिरात प्रवेश करून दानपेटी चोरी केलीये. तर दुसरीकडे गावात जय भवानी मंदिरात सुद्धा दानपेटी चोरून चोरट्यांनी लक्ष केले आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली आहे.


