वर्धा – *खाजगी प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा चे वतीने बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे कार्यालयात भेट देवून जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्यांविषयी शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी मा. श्रीमती धावडे मॅडम व कर्मचारी मा. श्री. बुरबुरेजी यांचे सोबत विस्तृत चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत भारत रत्न. स्व. राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळा देवळी या शाळेचे माहे नोव्हेंबर 2024 पासून बंद असलेले नियमित वेतन सुरू करण्याबाबत चर्चा करून तोडगा काढण्यात आला. तसेच ज्ञानभराती मराठी प्राथमिक शाळा, पुलगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका यांच्या पेन्शन केसबाबत चर्चा करून तोडगा काढण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा वर्धा येथील शिक्षकांचे समायोजन व पेन्शन केसबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. सदर सर्व समस्यांवर सकारात्मक चर्चा होवून वरिष्ठांशी चर्चा करून सर्व समस्या तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन मा. श्रीमती धावडे मॅडम यांनी यावेळी दिले. सदर चर्चेवेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा चे कार्यवाह मा. श्री. महेंद्र सालंकार, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव मा. श्री. सुरेशकुमारजी बरे, उपाध्यक्ष मा. श्री. संजय बावनकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा वर्धा चे सचिव श्री. प्रमोद खोडे, श्री. वानखडे सर, श्री. माहुरे सर, श्री. संभे सर, श्री. बोबडे सर, श्री. साळवे सर, श्री. कुंभारे सर, श्री. रावेकर सर व श्री. उभाड बाबू आदी उपस्थित होते.*


