पियुष गोंगले:- माहिती विभाग प्रमुख
दिं.१२ फेब्रुवारी २०२५गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात नक्षलप्रभावीत क्षेत्रात वसलेले कचारगड हे केवळ एक प्राचीन गुफा नसून गोंडीयन संस्कृतीचे श्रद्धास्थान आणि आस्थेचे केंद्र आहे. याच पवित्र भूमीत राष्ट्रीय गोंडीयन सांस्कृतिक महोत्सव, राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन आणि महागोंगोना कोयापुनेम महासम्मेलन माघ पौर्णिमेच्या निमित्ताने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य उत्साहात संपन्न झाले.*गोंडीयन परंपरेचे भव्य दर्शन*कचारगड ही एशियातील सर्वांत प्राचीन आणि विशाल गुफा मानली जाते.

ही गुफा सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेली असून गोंडीयन संस्कृतीचे रचनाकार पारी कुपार लिंगो, ३३ कोटी सगापेन, १२ पेन, ७५० गोत्र, रायताळजंगो, संगीत सम्राट हिरासुका पाटालीर, शंभूशेक आणि माता काली कंकाली यांचे पूजास्थान आहे. प्रत्येक वर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे संपूर्ण देशभरातील लाखो आदिवासी बांधव दर्शनासाठी येतात.*पर्यटन विकासाला चालना मा.खा.अशोकजी नेते* माजी खासदार अशोकजी नेते यांनी कचारगड यात्रेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पर्यटन विकास निधीतून कचारगडवर चढण्यासाठी पेव्हर ब्लॉक मंजूर करण्यात आला असून, या धार्मिक स्थळाला “क” दर्जातुन ‘ब’ दर्जा मिळाला आहे.

भविष्यात ‘अ’ दर्जा मिळावा यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, दर्जा प्राप्त झाल्यास कचारगडचा वेगाने विकास होईल, अधिक सुविधांची भर पडेल आणि श्रद्धाळूंना उत्तम सोयी मिळतील.असे प्रतिपादन मा.खा.अशोकजी नेते यांनी केले.पुढे बोलताना मा.खा.नेते म्हणाले कचारगड हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, आदिवासी संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे सरकार या ठिकाणी पायाभूत सुविधा, यात्रेसाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे, असे मा. अशोकजी नेते यांनी स्पष्ट केले.*मान्यवरांची उपस्थिती*या राष्ट्रीय गोंडियन सांस्कृतीक महोत्सवाला केंद्रीय राज्यमंत्री मा. दुर्गादासजी उईके,राज्याचे आदिवासी विकास मंञी तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री मान.अशोकजी ऊईके, यांच्या उपस्थिती संपन्न झाले.
प्रमुख उपस्थिती म्हणून SC/ST लोकसभा समिती अध्यक्ष मा. खा. फग्गनसिंहजी कुलस्ते, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. खा. अशोकजी नेते,आमदार संजयजी पुराम,काँकेर छ.ग.खासदार भोजराजजी नाग,माजी आमदार डॉ. नामदेव राव उसेंडी,माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुडके,आमदार रामदास जी मसराम, अर्चना मडावी,अध्यक्ष दुर्गादासजी कोकोडे,बारेलाल वरकडे,रमन सलाम,मनिष पुसाम,तसेच मोठया संख्येने समाजाच्या अनेक प्रतिष्ठित नेत्यांची उपस्थिती होती.
कचारगड यात्रेचे महत्त्वदरवर्षी पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंपरागत विधी, गोंडी गीत-संगीत, सांस्कृतिक नृत्य, बौद्धिक चर्चासत्रे आणि समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भातील चर्चासत्रेही या यात्रेचा एक भाग असतात.
गोंडीयन समाजासाठी कचारगड केवळ एक गुफा नसून आस्थेचे स्थान, सांस्कृतिक वारसा आणि आत्मपरंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे भाविकांची वाढती गर्दी, शासनाचे प्रयत्न आणि आदिवासी समाजाची श्रद्धा यामुळे कचारगडचा विकास वेगाने होईल आणि हे स्थळ जागतिक पातळीवर पर्यटनासाठी ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
