अकोला जिल्हा प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापुर मतदार संघाचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिडकर यांचा शिवनी जवळ अपघातात निधन झाल्याची वार्ता आज 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वा. वाऱ्यासारखी पसरली.

मुर्तीजापुर मतदार संघाचे विकास पुरुष असणारे एक मनमिळाऊ, कर्तबगार हरहुन्नरी राजकीय नेत्याला कायमचे मुकलोय. जिल्हासह मुर्तीजापुर व बार्शीटाकळी तालुक्यातील त्यांच्या चाहत्यांमध्ये व सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली.

