💥 पियूष गोंगले माहिती विभाग प्रमुख💥
!खनिज निधीचा वापर इतर तालुक्याच्या ठिकाणी केल्यामुळे स्थानिक तालुका विकासापासून वंचित?!….
स्थानिक तालुक्यांना न्याय केव्हा मिळेल? – डॉ, प्रनय भाऊ खुणे, अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश
दिनांक 13 फेब्रुवारी 2025 गडचिरोली जिल्ह्यातील खनिज प्रतिष्ठान निधी द्वारे गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात येत आहे परंतु सदर विकास कामे गडचिरोली जिल्ह्यातील इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत त्यामुळे ज्या गडचिरोली जिल्ह्यातील खनिज उत्खनन एटापल्ली तालुक्यातली सुरजागड या भागातून होत आहे
परंतु या भागातील दहा किलोमीटर अंतरावरील अनेक गावात जाण्यासाठी साधे खडीकरणाचे रस्ते सुद्धा आजपर्यंत झाले नाही अनेक नाल्यावर वर साधे पुलिया सुद्धा झाले नाही, येथील अनेक गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटतो व पुलिया नसल्यामुळे नावेचा वापर करून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते शाळकरी विद्यार्थ्यांची पावसाळ्यात शाळेत व तालुक्यात ये जा बंद असते आणि अनेक विकास कामे सुरजागड गौण खनिज उत्खनन पहाडी प्रभागात शिल्लक आहेत
परंतु सदर विकास कामे याच भागात होत नसून सदर खनिज प्रतिष्ठान निधी गडचिरोली जिल्ह्यातील इतर भागातील अनेक ठिकाणी करण्यात येत आहे त्यामुळे सुरजागड परिसरातील दहा किलोमीटर अंतरावरील अनेक गावे विकासापासून वंचित आहेत आणि स्वातंत्र्याचे इतक्या वर्षापासून आजपर्यंत या गावांचा विकास झाला नाही आणि या गावांमध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक व दळणवळण विकासाची नितांत गरज आहे
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथून लोह खनिज ने आन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते नाल्या व मोठाले पुलिया तयार करण्यात येत आहेत परंतु एटापल्ली तालुक्यातील अनेक गाव रस्ते नाली आणि पुलिया पासून वंचित आहे सदर गडचिरोली जिल्ह्यातील खनिज प्रतिष्ठान निधी सर्वात आधी एटापल्ली तालुक्यातील विविध गावांचा विकास करण्यासाठी व येथील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास करण्यासाठी करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे,प्रदेश उपाध्यक्ष डॉ, भारत खटी, राहुल भाऊ झोडे,राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली सय्यद , गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ समरीत, महिला आघाडी अध्यक्ष मनिषा ताई मडावी,जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, मुन्ना भाऊ दहाडे, महेश अलोणे तालुका अध्यक्ष नागेश मडावी, सल्लागार फारुख भाई शेख, सुरेश दुर्गे,भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर, एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्नील मडावी व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना अहेरी तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले.


