यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे*
मोहदा येथे महिला शिवपुराण समिती, हनुमान मंदिर देवस्थान, सोमेश्वर शिव मंदिर, जयहिंद दुर्गाउत्सव मंडळ, नवयुवक दुर्गाउत्सव मंडळ, भागवत सप्ताह समितीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत गुरु माऊली शांताबाई रोकडे , नारायण महाराज संस्थान, जगदंबा नगरी हनुमान मंदिराजवळ सराटी रोड मोहदा येथे श्री.शिवपुरान कथाकार ह.भ.प.सोनालीदिदी महाजन (आळंदीकर) यांच्या मधुन वानीतुन श्री.शिवपुरान कथा वाचन केल्या जात आहे.
श्री.शिवपुरान कथा ऐकण्यासाठी मोहदा गावातील तसेच परीसरातील महिला,पुरुष, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्री.शिवपुरान कथा श्रवण करीत होते.तसेच दिनांक १३-२-५ रोज गुरुवारला ह.भ .प.महेश महाराज महाजन आंळदीकर यांचे काल्याचे किर्तन करण्यात आले.व महाप्रसादाचे आयोजन केले होते.



