अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
चायनीज मांजाच्या विक्रीवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत ९१ हजार ५०० रुपये किमतीचा चायनीज मांजा जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांवर कारवाई केली आहे. *मोहम्मद अय्याज शेख हसन* रा. खैरमोहम्मद प्लॉट, हा त्याच्या राहत्या घरी चायनीज मांजा विक्री करिता बाळगतांना आढळून आला. त्याच्या जवळून ७६ हजार रुपयांचा व पवन टावरी याच्या जवळून १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

