छत्रपती संभाजीनगर प्रतिनीधी: – कृष्णा सोलाट
सर्व सामान्य नागरिकांना तसेच विद्यार्थी यांना पुन्हा एकदा वाचनाकडे वळवण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे बुधवारी पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांत दिलेल्या QR कोडवर छत्रपती संभाजीनगर येथील वाचकांनी आपले फोटो व व्हिडिओ पाठवुन सक्रिय सहभाग नोंदवला अशी माहिती जिल्हा ग्रंथालय संचालक सुनील हुसेन यांनी दिली.

