विदर्भ विभाग प्रतिनिधी युसुफ पठाण
गिरड / मोहगाव येथील शेकडो नागरिकांनी ऊध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.
शिवसेना पक्ष प्रमुख ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे पश्चिम विदर्भ नेते खासदार अरविंद सावंत व वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा सह – संपर्क प्रमुख सीताराम भूते यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश घेण्यात आला.
याप्रसंगी समूद्रपूर तालुका प्रमुख प्रभाकर चामचोर, हिंगणघाट विधानसभा संघटक लक्ष्मण डंभारे, समूद्रपूर तालुका संघटक दीपक टोहोकर, समूद्रपूर उप तालुका प्रमुख लक्ष्मण भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मोहगाव येथील पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलतांना शिसैनिकांनी पक्ष प्रमुख ऊध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतांना जनतेचे सरकार आहे.
हे जाणवायचे.कार्यकाळामध्ये शेतकर्यांना सन्मानाने वागणूक देऊन शेतकर्यांनच्या मालाला भाव, व शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी केली. मात्र आताच्या सरकारने पोकळ आश्वासन दिले आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली.यामुळे सुलतानी सरकारचा आम्ही निषद करतो असे वक्तव्य शिवसैनिकांनी व्यक्त केले.
यावेळी शाखा प्रमुख पंढरी शिरूडे,उप शाखा प्रमुख दिनेश वाघाडे यांच्या उपस्थितीत दिलीप राऊत, प्रमोद शहारे, अमोल पोहनकर, किशोर कोटमकर, बळिराम चौरे, दादा शेळके, शुभम राऊत, नाना कोल्हे, यशवंत राऊत, आदित्य रंदये, विक्की शिरूडे, लक्की शिरूडे, विकास घरत , अर्जून झाडे विलास राऊत, अंकुश पोहनकर, अजय राऊत, गोविंदराव रंदये, ईश्वरराव शिरूडे, सतिश सातपुते, हिरामन शहारे, पंढरी शिरूडे,लटारू शिरूडे, करून चौधरी, राघो वाघाडे, वसंतराव वरखडे, जनार्दन वरखडेश्रावण राऊत यांनी पक्ष प्रवेश घेतला.


