अकोला जिल्हा प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
अकोला:- मनारखेड येथील रेल्वेगेट जवळ एकाच गावातील लोकांमध्ये क्षुल्लक कारणावरून वादविवाद होऊन एकमेकांना शिविगाळ करून थापडा बुक्क्यांनी तसेच पाइपने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी, परस्पर तक्रारीवरून दोन्ही बाजूंच्या लोकांविरुद्ध बाळापूर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. बंटी उर्फ रितेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळापूर पोलिसांनी वेदांत संतोष सुरूशे व इतर तीन जणांविरुद्ध ३२३ (५) बीएनएस अन्वये गुन्हा नोंदविला. वेदांत संतोष सुरूशे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी शेळके व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


