भंडारा विभाग प्रतिनीधी:- प्रीतम कुंभारे

१ डिसेंबरला माता चौंडेश्र्वरी मंदिर मोहाडी येथे
प्राध्यापक मा. श्री राजकुमारजी घुले राष्ट्रीय अध्यक्ष यांचे आदेशानुसार लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया शाखा मोहाडीच्या बैठकीचे आयोजन *दि. १ डिसेंबर २०२४ रोज रविवारला दुपारी १२.०० वाजता माता चौंडेश्र्वरी मंदिर मोहाडी येथे* करण्यात आलेले आहे.
बैठकीला लोककला सेवा मंडळाचे पदाधिकारी श्री सुनीलजी डहाट विदर्भ उपाध्यक्ष, श्री राजुभाऊ भोयर विदर्भ सचिव, श्री विजयजी पालांदुरकर विदर्भ संघटक, श्री सचिनजी कडू नागपूर जिल्हाध्यक्ष, श्री ईश्वरजी मानकर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, सौ. उर्मिलाताई चौधरी भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष
व इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
*बैठकीचे विषय*
१) पात्र कलावंतांना मानधन मिळण्याबाबत मार्गदर्शन.
२) नोंदणीकृत मंडळांना शासनाच्या योजना मिळण्याबाबत मार्गदर्शन.
३) कलाकारांना शासनाच्या इतर सोयीसुविधा मिळण्याबाबत मार्गदर्शन
४) भंडारा जिल्ह्यात लोककला. मंडळाचे कार्य वाढविण्याबाबत चर्चा करणे.
५) कलाकारांच्या अडीअडचणीबाबत चर्चा करणे.
६) वेळेवर येणारे इतर विषय.
करिता मोहाडी तालुक्यातील सर्वस्तरिय कलावंतांनी वरील बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
*विनीत*
श्री विजय बोकडे
*सचिव*
लोककला सेवा मंडळ मोहाडी तालुका...


