अकोला विभाग प्रतिनिधी:- गणेश वाडेकर..
अकोला ( बाळापूर )
गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बाळापूर शहरातील हाजी नगर येथील एका युवकाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री नंतर म्हणजे गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी १.३० वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून गुरुवारी रात्रीच्या दरम्यान एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील शोध बाळापूर पोलीस घेत आहेत.


