अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला:- सिविल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठी उमरी परिसरातील सैनिक कॉलनी येथून एक महिला पतीचा डबा घेऊन जात असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविणाऱ्या अज्ञात चोरट्यास सिव्हिल लाइन्स पोलिसांनी बुधवारी अटक केली. या चोरट्याला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आशिष मंगलदास ठाकरे राहणार तपे हनुमान मंदिराजवळ असे आरोपीचे नाव आहे. मोठी उमरी परिसरातील रहिवासी महिला पतीचा जेवणाचा डबा घेऊन जात असताना समोरून येत असलेल्या चोरट्याने सोनसाखळी लंपास केली होती.पुढील तपास पोलीस करत आहेत .


