पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनीधी
*एटापल्ली: भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथील (राज्यशास्त्र विभाग , विद्यार्थी विकास विभाग, रासेयो विभाग) व भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व ,कर्तव्य याबद्दल माहिती देण्यात आली तसेच राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अठरा वर्ष पूर्ण केलेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे. निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढविणे. नि:पक्षपणे मतदान करणे.तसेच राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थी तथा प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस एन बुटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.धनंजय पोटदुखे, श्री.जे एम सिडाम, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डाॅ संदिप मैंद, प्रा. डॉ. बि. डी. कोंगरे, प्रा. डाॅ. विनोद पत्तीवार, प्रा. डॉ शरदकुमार पाटील, प्रा. डाॅ विश्वनाथ दरेकर, प्रा. निलेश दुर्गे, प्रा. डाॅ राजीव डांगे, प्रा. राहुल ढबाले, प्रा. चिन्ना पुंगाटी प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. डॉ साईनाथ वडस्कर, प्रा. अतुल बारसागडे,प्रा. सविता भांडेकर, श्री. शेख सर, श्री. राजूरकर सर, प्रा. झिलपे, प्रा. घोंगडे तथा बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

