सिद्धार्थ कदम :-यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद:-मुंबई ठाणे या ठिकाणहून रॉयल इन्फिल्ड, बुलेट यासारख्या महागड्या गाड्या चोरून या गाड्याचे नंबर प्लेट बदलून पुसद परिसरात विक्री करणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाकडून उघड झाले असून एकूण८ मोटरसायकल जप्त करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ याच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस अधीक्षक तथा/उपविभागीय पोलीस अधिकारी चुलुमुला रजनीकांत, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यवतमाळ ज्ञानोबा देवकते. यांच्या आदेशाने पेट्रोलिंग करत असताना. गोपनीय माहिती मिळाली आरोपी प्रमोद दत्ता पवार वय वर्ष ३५ राहणार एरंडा तालुका पुसद याने पुसद बस स्थानक येथून हिरो होंडा स्प्लेंडर गाडी चोरी केली आहे त्यावरून सदर आरोपी ताब्यात घेऊन सखोल चौकशी करता त्याने पुसद बस स्थानक येथून चोरी केलेल्या गाडीची कबुली देऊन त्याचे भाऊजी आरोपी योगेश वसंत पाच पिले वय वर्ष ३६ राहणार नालासोपारा ठाणे. याने इतर ७ मोटार सायकल या मुंबई, परिसरातून चोरी करून त्यांना बनावट नंबर प्लेट बसून पुसद परिसरात विक्री केल्या आहेत. त्या सर्व ८ मोटार सायकल त्यामध्ये ३ रॉयल इनफिल्ड, बुलेट १ पल्सर, २ युनिकॉर्न, २ स्प्लेंडर जप्त करू एकूण ६ मोटरसायकल चोरीची गुन्हे उघडकीस आणले. अशाप्रकारे कौशल्यपूर्ण रीतीने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने आरोपी प्रमोद दत्ता पवार यास अटक करून रॅकेटचा पर्दाफाश करून ७ लाख १५ हजार चा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे..


