खारपाडा पेण प्रतिनीधी: – कैलास राजे घरत
खारपाडा पेण :-. जिते केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळा बळवली या ठिकाणी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री. मुकुंद पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या असून त्यात रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा या शाळेने भरघोस बक्षीस मिळवून केंद्रात आपले नाव सलग दुसऱ्यांदा उच्च स्थानावर ठेवले आहे.

यावर्षी खेळवण्यात आलेले सामने लंगडी, लगोरी, बेचकीने नेम धरणे, दोरी उडी, यात चालू वर्षी लगोरी हा नव्याने घेण्यात आलेला खेळ आहे. वरील सर्व क्रीडा स्पर्धेत खारपाडा शाळेने मोठा गट- इयत्ता ५ वी ते ८ वी1) लंगडी- पहिला नंबर2) बेचकीने नेम धरणे- पहिला नंबर3) दोरी उड्या- दुसरा नंबर 4) लगोरी- दुसरा नंबर छोटा गट- इयत्ता १ ली ते ५ वी1) लगोरी- पहिला नंबर2) लंगडी – दुसरा नंबर 3) दोरी उडी – दुसरा नंबर वरील सर्व स्पर्धांमध्ये खारपाडा शाळेतील विद्यार्थी आपले स्थान उच्च स्तरावर ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. यापूर्वी शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक २ सन २०२४/२५ मध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून रुपये पाच लाखाचे बक्षीस देखील मिळविले आहे. नुकतेच जिल्हा परिषद रायगड शिक्षण विभागाने याच शाळेतील महाराष्ट्र राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी इयत्ता ६ वी ते ८ वी या वयोगटातील ३ विद्यार्थिनी व ३ विद्यार्थी असे सहा विद्यार्थ्यांची निवड केली असून शाळेतील उपशिक्षिका सौ.नंदिनी कदम यांना मार्गदर्शक म्हणून नेमणूक दिली आहे. शाळेचे रायगड जिल्हा शिवभूमी आदर्श शिक्षक, अविष्कार फाउंडेशन राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक एम्पॉवर फाउंडेशन आदर्श मुख्याध्यापक श्री प्रविण लक्ष्मण पाटील यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली शाळेतील सहशिक्षक सौ नंदिनी कदम मॅडम,श्री. दिनकर पाटील सर, सौ ज्योती पाटील मॅडम, सौ संगीता पाटील मॅडम, सौ सुरेखा रुपनर मॅडम हे सतत उत्तम कामगिरी करत असून शाळा व्यवस्थापन कमिटी मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या समन्वयाने शाळा नेहमीच नवीन नवीन उपक्रम, स्पर्धा परीक्षा यामध्ये नाव लौकिक करीत आहे. शाळा नेहमीच उत्तम कामगिरी करीत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचेअभिनंदन, कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. सर्व स्थरातून शाळेचे विशेष कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


