गणेश राठोड जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ जिल्हात रूजू झाले तेव्हा पासून एस.पि.कुमार चिंता साहेब यांचे कडून वेळोवेळी अवैध व्यवसायीकांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलिस विभागाला देण्यात येत असतानाही एस.पी.साहेबांच्या आदेशाला बेदखल करत,फुलसावंगी येथील मद्य तस्कर थेट मराठवाडा व बंदीभागात बिन दिकत देशी व विदेशी दारूची तस्करी करत आहे. येथून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मराठवाड्यातील इवळेश्वर,महादापुर,वानोळा,पानोळा,मोहपुर,दिगडी,शिंदगी,कुपटी तसेच बंदीभागातील आमडापुर,कुरळी,घमापुर, बोरगाव, डोंगरगाव,तसेच महागाव तालुक्यातील काळी, टेंभी, पिंपळगाव,वडद,वरोडी,या गावांसह अन्य गावांना राजरोसपणे आलीशान चारचाकी व दुचाकीवर खताच्या गोणी मध्ये देशी व विदेशीचे बॉक्स च्या बॉक्स वरील गावातील पानटपरी, हाँटेल,किराणा दुकानावर घरपोच पोहचवण्यासाठी एक विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे तळीरामांना दारुचा मुबलक पुरवठा होत असल्याने या मद्य तस्करामुळे गावा गावात भांडण तंटे वाढले आहे.यामुळे प्रत्येक गावात गृहकलहाचे प्रमाण वाढले आहे.तसेच सहज दारू उपलब्ध होत असल्याने गाव खेड्यातील किशोरवयीन मुले या घातक व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याने हि तरुण पिढी व्यसनात गारद होत असल्याचे चित्र दिसत आहे. या व्यवसायातून हा मद्य तस्कर फक्त आर्थिक फायदाच बघत आहे.त्यांच्याफायद्यासाठी गोर गरीबांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.त्यामुळे या दारू तस्करीवर आळा घालुन गारद होणारी तरूणाई वाचविण्याचे आव्हान एस.पी.साहेबान पुढे उभे ठाकले आहे.****************** #स्थानीक गुन्हे शाखा कुचकामी! पुसद येथील गुन्हे शाखा असतांनाही यांच्या कार्य क्षेत्रात येत असल्याने फुलसावंगी येथून एवढ्या मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूची मराठवाड्यात,बंदीभागात होत असतानाही स्थानिक गुन्हे शाखा ही या मद्य तस्करावर कारवाई करत नसेल तर स्थानिक गुन्हे शाखा कुचकामी ठरत आहे असे म्हणंणे वावगे ठरू नये.


