वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
मोरांगणा/खरांगणा:- दिनांक ११/१२/२०२४ रोजी विधानसभा आर्वी मतदार संघाचे आमदार सुमित भाऊ वानखेडे यांचा कार्यक्रम महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या सौजन्याने पशुसंवर्धन विभाग वर्धा व गौळाऊ गोवंश जतन ,संवर्धन ,सशोधन व पैदासवार चॅरिटेबल ट्रस्ट ,तळेगाव रघुजी यांचे द्वारे गवळाऊ जनावराचे भव्य प्रदर्शन उद्घाटन बक्षीस वितरण सोहळा मोरांगणा, खरांगणा येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आर्वी चे आमदार सुमित भाऊ वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवनिर्मिती पशुखाद्य उत्पादक समूह खरांगणा यांच्या स्टॉलला माननीय आर्वी विधानसभे चे आमदार सुमित वानखेडे साहेब यांनी भेट देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पशुखाद्य उत्पादक समूहाच्या सौ. नंदाबाई शेंदरे, ममता राजूरकर, बबीता मलगाम, वर्षा परतेकी, कांचन सयाम , दिपाली हेले या प्रामुख्याने उपस्थित होत्या .


