साकडबाव जिल्हा परिषद गटातील साकडबाव, पायरवाडी,जुनावणी,पोकळ्याचीवाडी, पारधवाडी, बाबरवाडी,पाचरवाडी, चिल्हारवाडी….
प्रतिनिधी:- सगीर शेख खर्डी
- लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) श्री. दौलतजी दरोडा साहेब यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर आमदार साहेबांचे स्वागत केले.या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य युवा नेते श्री. हरीश (भाऊ) दरोडा व श्री.समिर दाजी चौधरी यांचे लाभले. यावेळी व्यासपीठावरून बोलतांना आमदार साहेबांनी सांगितले की शैक्षणिक साहित्य वाटपाची संकल्पना आम्हाला आमचे गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांनी दिली आम्ही स्वतः त्यांनी वाटप केलेले शैक्षणिक साहित्य वापरले आहे.
- गुरुवर्य दिघे साहेबांची शिकवण देणाऱ्याने देत जावे हे माझे शिष्य निश्चितच पार पाडत आहेत.तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला हात देईल म्हणजेच माझ्याकडून काहीही मदत लागली तर तुम्ही मला हाक द्या मी निश्चितच ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले. यावेळी आमदार साहेबांच्या सोबत युवा नेते हरीश (भाऊ) दरोडा, श्री. अशोकजी कुडव, श्री. दाजी भाऊ चौधरी, उद्योजक श्री. वासुदेव भोईर, चिल्लरवाडीचे माजी सरपंच श्री. बारकु मामा वाघ, ग्रुप ग्रामपंचायत साकडबाव च्या विद्यमान सरपंच सौ. रंजना प्रदिप गिरा मॅडम, ग्रामविकास अधिकारी श्री. तरवारे, युवासेना कार्यकर्ते श्री.गणेश मारुती चौधरी,श्री. लक्ष्मण चौधरी,श्री. गजानन मामा विशे, श्री. गणेश दादा फर्डे, श्री. किरणजी तिवरे व मोठ्यासंख्येने परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्ते,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी साकडबाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचे यथोचित स्वागत करण्यात आले.


