विदर्भ विभाग प्रतिनिधी:- युसूफ पठाण
देवळी ते डिगडोह रोडवर यशोदा नदीचे पुराचे पाण्यामध्ये भावेश अमोल कापसे रा.डिगडोह, प्रज्वल पंडित सावरखेडे रा.नागझरी, उमेश रामदास साखरकर रा.नागझरी हे अडकले असल्याची माहिती प्राप्त होताच अग्निशमन आणीबाणी सेवा नगर परिषद ठेवली.
फायर टीम घटनास्थळी पोचली

उपस्थित कर्मचारी श्री विशाल नाईक अग्निशमन अधिकारी देवळी श्री अक्षय शिरसागर वाहन चालक रंजीत दाभेकर फायरमन आसिफ शेख फायरमन ठाणेदार श्री अमोल मंडळाकर यांनी पोलीस मुख्यालय वर्धा येथील रेस्क्यू टीम बोलावून टीम मधील पोहवा शिवा कुमरे, पोलीस अंमलदार सत्यम शिंदे, नितीन शेंडगे, वैभव करपे, संग्राम साबळे, दत्ता मोरे यांचे मदतीने पुराचे पाण्यात अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यात आले आहे.


