राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव:-तालुक्यातील आपटी (रामपूर ) येथे दि.२४-०६-२०२५ रोजी गोंडवाना साम्राराज्यावर १६ वर्ष राज्य करणारी शूर पराक्रमी विरागंणा राणी दुर्गावती मडावी ने आपल्या असामान्य कर्तुत्वाने आपले नाव मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये नोंदवून मध्यप्रदेशाच्या गौरवशाली इतिहासाला अधिक अजरामर करून भारतीय नारी ही अबला नसून सबला असल्याचे सिद्ध केले.
मडावी घराण्यातील राजे शंकरशहा व कुवर रघुनाथशहा या पितापुत्रांना जोडी एकत्र बांधून १८ सप्टेंबर १८५७ रोजी ठार केले पण त्याची साधी नोंदही इतिहासात नाही. असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेली राणी दुर्गावती ही यांची एकुलती एक मुलगी दुर्गाष्टमीच्या दिवशी जन्म (५ ऑक्टोबर १५२४) झाल्यामुळे मुलीचे नाव दुर्गावती ठेवण्यात आले. राठमहोबा हे राजे शालिवाहन यांचे राजधानीचे ठिकाण होते.
हे ठिकाण गोंडवण्याच्या उत्तर सीमेला लागून आहे. दुर्गापती ही शालिवाहन राजाची एकुलती एक मुलगी असल्याने चांगले संस्कार जान,धैर्य, स्वाभिमान असे अनेक सदगुन राणीला वारसा हकाने प्राप्त झाले होते. दुर्गापती धनुर्विचेत तस्खेज असल्याने ती वाघांची सहज शिकार करीत होती. गोंडवाना महापराक्रमी राजा संग्रामशहा च्या सुंदर,सुस्वभावी व पराक्रमी असलेल्या दलपतग्रहा नावाच्या पुत्राच्या प्रेमात दुर्गावती पडली.अनेक सामाजिक बंधने डांगारून सन १५४३ साली दुर्गावतीने दलपतग्रहाशी आंतरजातीय विवाह करून १६ व्या शतकात आदर्श नारीची भूमिका बटविली.
राणी दुर्गावती महिला पोलीस बटालियन स्थापन करण्यात आले तसेच भारत सरकारद्वारा राणीच्या स्मृती दिनाचे निमित्याने २४ जून १९८८ रोजी राणी दुर्गावती चे छायाचित्र असलेले ६० पैशाचे पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले.
यांची पुण्यतिथी निमित्याने पर्यावरण संवर्धन विकास समितीचे राळेगाव यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मा. श्री.विनोद दोंदल अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आपटी (रामपूर) या ठिकाणी वृक्ष रोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोहचाडे सर ( गोंडवाना संग्राम पार्टीचे प्रदेश महासचिव) व उपाध्यक्ष धनुजी पुरके (वसंत माध्यमिक विद्याल्य पिपंळखुटी या संस्थेचे अध्यक्ष ) हजर होते.

शूर विर राणी दुर्गावती यांच्या जीवन कार्यावर व झाडे लावा झाडे जगवा यावर प्रकाश टाकला.
यावेळी गावातील पुरुष ओम मेश्राम, राजेश्वर मेश्राम, दिपक कोडापे, मारोती उइके सदाशिव पावले, वामन कुमरे, कैलास कोडापे (पत्रकार )महेश मेश्राम, वासुदेव पुसनाके रितेश कोहनुमान कुमरे,डापे, विशाल आत्राम,आणि महिला, वंदनाताई मेश्राम, कविता (पत्रकार) शांताबाई उइके,सुरेखा येरकाडे, वंदना ताई शाशिकला तोडसे, किन्नके,ललिता कोडापे ताईसरला मरसकोल्हे दुर्गा मडावी, अनुसया पुसनाके,नीलिमा पुसनाके, भरती पुसनाके, प्रेमीला मेश्राम,उमा पावले, वैशाली कुमरे मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली होती.


