वर्धा विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी पकडला गांजा….
पोलीस स्टेशन वर्धा शहर ला पीएसआय शरद गायकवाड हे त्यांच्या अधिनिस्त असलेल्या प्रगटीकरण पथकाच्या अंमलदारासह दैनंदिन कामकाज करीत असताना त्यांना मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली की, एक इसम सेंट अँथनी शाळेसमोर लहानोजी नगर गेट जवळच्या बाजूला एका मोपेड गाडीवर बसून गांजा या अमली पदार्थाची लपून चोरून विक्री करीत आहे .
अशा माहितीवरून त्या इसमास् ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातील मोपेड गाडीचे डिक्कीत एकूण 1430 ग्रॅम गांजा अमली पदार्थ किंमत 30,000 / व एक मोपेड निळ्या रंगाची सुझुकी ऐसेस क्रमांक MH 32 ए एफ 3176 कि. 70,000 रुपये असा जु. कि. 1,00,000 रुपये चा माल मिळून आला.
सदरची कारवाई हि माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे सर उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या निर्देशाप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक पराग पोटे ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात पोउनि शरद गायकवाड सर, पोउपनि उमेश उगले,गुन्हे प्रगटीकरणाचे पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, शैलेश चाफाळेकर, पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पवन लव्हाळे,पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, नंदकिशोर धुर्वे, शिवा डोईफोडे, अनिल चव्हाण,सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश उगले पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहे.


