अहेरी तालुका प्रतिनिधी – सुरेंद्र तावाडे
अहेरी आगारात कमी बसफेऱ्या असल्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत.अहेरी मुख्य आगारातून चंद्रपूर, गडचिरोली,भामरागड, सिरोंचा या चारही मार्गाने प्रवास करणाऱ्याची संख्या जास्त असल्याने वाहतूकिच्या सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
बस वाहतूक शिवाय इतर मार्गाने प्रवास करण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत.खाजगी गाड्यांचे भाडे खूप जास्त असल्याने प्रवाशांच्या खिशाला जास्त भार सोसावा लागतो. तरी बसफेऱ्या वाढवावे अशी मागणी होत आहे,याकडे वाहतूक मंडळाने लक्ष द्यावे.


