अकोला जिल्हा प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
गुन्हे शाखा अकोला ची कार्यवाही पो स्टे खदान, पो. स्टे जुनेशहर, पोस्टे तेल्हारा हद्दीत दिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी कडुन १,३७,०००/-रू चा मुद्देमाल जप्त….
सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, दिनांक २/१/२०२५ रोजी फिर्यादी नामे श्रीमती रेखा विजय घोडे, वय ३७ वर्षे रा. व्यवसाय खाजगी नोकरी रा. चक्रधर आक्रेड अपार्टमेंट बसेरा कॉलनी, अकोला. यांनी पो स्टे खदान येथे रिपोर्ट दिला की, फिर्यादी त्यांचे राहते घराला कुलुप लावुन घराचे बाहेर नोकरी करीता गेल्या असता अज्ञात इसमांनी त्यांचे घराचे दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन आत प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले १) नगदी १,००,०००/रू २) सोन्याचा गोफ १० ग्रॅम कि. ४५,०००/रू असा एकुण १,४५,०००/रू. चा मुद्देमाल चोरून नेला आहे. अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पो स्टे खदान येथे अपराध क्रमांक ५/२०२५ कलम ३३१ (३),३०५ (अ) भा न्या सं गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
सदर गुन्हा उघडकीस आणने कामी मा. पोलीस अधिक्षक सा. यानी आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांनी आरोपी १) आकाश प्रकाश पवार, वय ३५ वर्ष रा.बाराई ता मेहकर जि. बुलढाणा ह. मु. फत्तेपुर ता. खामगांव, जि. बुलढाणा, २) उमेश गटरंग पवार, वय २८ वर्ष रा.टाकरखेड हेलगा ता चिखली जि. बुलढाणा ह.मु. फत्तेपुर ता. खामगांव, जि. बुलढाणा यांना त्याचे कडील गुन्हयात अटक केले त्या नंतर नमुद आरोपीतांना अकोला येथील घरफोडी चे गुन्हयात ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांचे कडुन पो.स्टे. खदान, जुनेशहर, तेल्हारा येथील दिवसा घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केल्याने सदर गुन्हयात चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी १५ ग्रॅम सोने की अं. १,३५,०००/-रू तसेच २० ग्रॅम चांदी की. अं २००० असा एकुण १,३७,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री. अभय डोंगरे सा. यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. सहा. पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, पोहवा वसीमोद्दीन, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, एजाज अहमद, किशोर सोनोने, सुलतान पठाण, रविद्र खंडारे, पो. कॉ आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखडे, मो. आमीर, अशोक सोनवणे, सतीष पवार चालक प्रशांत कमलाकर यांनी केली.

