जिल्ह्याचे पालकमंत्री – गृहराज्य मंत्री गप्प ! “
: – महेंद्र मुनेश्वर
वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- युसूफ पठाण
वर्धा जिल्ह्यात अनेक वेळा प्रजासत्ताक दिनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यगौरव,निःस्वार्थ सेवेची भावना,शौर्य आणि कर्तव्यप्रेम याबद्दल पदक आणि सन्मानचिन्हांनी सन्मानित करण्यात आले आहे.परंतु येथिल आजची पोलिस प्रशासन सुव्यवस्था कोलमडली आहे.गांधी जिल्ह्यात दारु बंदी असताना पोलिसांची खुलेआम हप्ता वसुली सुरु आहे “जिल्ह्याचे पालकमंत्री – गृहराज्य मंत्री मात्र गप्प आहेत .” हि महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या “कर्म भूमी” वर्धा जिल्ह्यात शोकांतिका आहे.असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी म्हटले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे खंबीर नेतृत्व व त्यांच्या पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची भूमिका कुठेच प्रामाणिक दिसत नाही.दारु बंदी च्या नावावर करोडोची हप्ता वसुली सुरू असुन आधे इधर-आधे उधार;अशी परिस्थिती आहे.मी नाही त्यातली कडी लावा आतली असे सोंग जिल्ह्यात सर्वत्र पोलिस स्टेशन मध्ये दिसत आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री काय करतात,ते तर गृह राज्यमंत्री आहेत.पालकमंत्रीच तर आशीर्वाद देत नसावे ? अशी पण बोली भाषा ऐकु यायला लागली आहे.मोहा फूल, देशी – विदेशी दारु खुली विकु देण्यासाठी विक्रेत्यांकडून पोलिस निरीक्षक,उप निरीक्षक,त्यांचे सहायक,जमादार,शिपाई व महिला पोलिस कर्मचारी सुध्दा खुलेआम हप्ता घेत आहे.या संदर्भात वर्धा लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार यांच्या भूमिकेशी रिपाइंचा जिल्हा अध्यक्ष म्हणुन मी सहमत आहे.त्यांनी वर्धा जिल्ह्यात दारूच्या वाढत्या महापुरा संदर्भात स्वतः खंत व्यक्त करुन वास्तव मांडले आहे.
गृह विभाग व पोलीस यंत्रणा हा केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणारा नाही,तर तो समाजातील शांतता,सुरक्षा आणि विश्वासाचा खंबीर स्तंभ आहे.पण हा स्तंभच वर्धा जिल्ह्यात (गांधी जिल्ह्यात) जीर्ण झाला आहे.येथिल प्रत्येक पोलिस स्टेशन चे ठाणेदार व त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपिता गांधी व आचार्य विनोबांच्या विचारांच्या प्रेरणेची जाणीव आहे,असे जिल्ह्यात कुठेच निदर्शनास येत नाही.
गांधी जिल्हा हा पोलिस निष्ठेचा,शौर्याचा आणि सामान्य जनतेच्या सेवेचा प्रतिक व्हावा,हिच सामान्य जनतेची इच्छा आहे.असे जर होत नसेल तर वर्धा जिल्ह्यातील दारु बंदी हटवावी, मोहा फूल व देशी विदेशी दारु खुली करावी.दारु पिनाऱ्यांना चांगली दारु प्यायला मिळेल.
असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी पत्रकात असेही म्हटले आहे.


