सिद्धार्थ कदम
पुसद प्रतिनिधी
68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जयभीम नगर,गुंज येथील भीम अनुयायांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाची सुरूवात सामुहिक त्रिशरण पंचशीलाने करण्यात आली.
समिक्षा, अस्मिता, पुनम, स्वराज, अनुराग, आशिष या चिमूकल्यांनी भाषण आणि गीताच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी युवा परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष राजू भाऊ कांबळे, सुखदेव कोल्हे, राजेंद्र कांबळे, मधूकर कांबळे, वैभव कांबळे, माधव वाघमारे, बाळकृष्ण कांबळे, सिकिंद कांबळे, धम्मा कांबळे, चंद्रशेखर कांबळे, साईचरण गोले, राहुल कांबळे, विशाल वाघमारे, शीलवान कांबळे, हर्षदिप कांबळे, बोधिसत्व कोल्हे व पौर्णिमा कांबळे,निर्मला कोल्हे,प्रतिक्षा कोल्हे, रिना कांबळे, मनिषा कोल्हे व इतरही अनुयायी व बौध्द उपासक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयशील कांबळे यांनी केले.


